loader image
[ays_poll id=7]

निवडणूक आयोगाच्या चुकीच्या व एकतर्फी निर्णयाच्या विरोधात आमदार कांदे यांची हायकोर्टात याचिका

Jun 13, 2022


नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकमध्ये शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार असून केंद्रीय निवडणूक आयोगोविरोधात सुहास कांदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केले. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नसल्याचा आरोप कांदे यांनी याचिकेत केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्याचे आदेश दिले होते. सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर ती घडी न घालता तशीच ठेवली असल्यानं त्यांचं मत रद्द करण्यात आले होते. मत बाद करण्यावर
सुहास कांदे यांचा आक्षेप आहे. चुकीच्या पद्धतीने मत केले बाद निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
.