loader image
[ays_poll id=7]

रेल्वे बोर्ड व ऑल इंडिया एससी एसटी असो च्या बैठकीत केदारे यांनी केल्या विविध मागण्या

Jun 13, 2022


भारत सरकारच्या रेल्वे बोर्ड व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची केंद्रीय कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक रेल्वे मंत्रालय,नवी दिल्ली येथे रोजी संपन्न झाली.
रेल्वे बोर्डचे सी.ई.ओ.मा.व्ही.के.त्रिपाठी यांच्या सोबत झालेल्या मिटिंगचे नेतृत्व असोसिएशन चे केंद्रीय अध्यक्ष मा.बी.एल.बैरवा व केंद्रीय महामंत्री मा.अशोकुमार यांनी केले तर मध्य रेल्वे चे प्रतिनिधी म्हणून झोनल सचिव सतिश केदारे हे उपस्थित होते.
यावेळी रेल्वे बोर्डचे सी.ई.ओ.मा.व्ही.के.त्रिपाठी यांना ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल कमिटी मध्य रेल्वे झोनल सचिव सतिश केदारे यांनी निवेदन देऊन विविध मागण्या केल्या
(१) मोठ्या प्रमाणात मनमाड वर्कशॉपला वर्कऑडर मिळावी, तसेच होलिस्टिक समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात,
(२) नाशिक रोड येथील टी.एम.डब्ल्यु. वर्कशॉपला हेमू कामाचे अतिरिक्त काम देण्यात यावे.
(३) मनमाड ते नाशिक रोड या दरम्यान सकाळी नाशिक रोड वरून व संध्याकाळी मनमाड वरून नवीन मेमू रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी कारण मनमाड वर्कशॉप व ओपन लाईन चे रेल्वे. कर्मचारी व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अप डाऊन करतात.
(४)अप डाऊन करण्याच्या दृष्टीने रेल्वे कर्मचारी वर्गाला कार्ड पास सुविधा सुरू करण्यात यावी.
आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.