loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनमाड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४९ वा हिंदुसाम्राज्यदिन साजरा

Jun 13, 2022


मनमाड : (योगेश म्हस्के)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने संपूर्ण वर्षभरात सहा महत्वपूर्ण उत्सव साजरे करण्यात येतात त्याप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४९ वा हिंदुसाम्राज्यदिन जेष्ठ शुद्घ त्रयोदशी ( शिवराज्याभिषेक दिन)श्री गजानन महाराज मंदिर शिवाजी नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला मरेमा विद्यालय चे जेष्ठ शिक्षक दैनिक मुंबई तरुण भारत चे पत्रकार श्री हर्षद गद्रे सर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सर्व प्रथम स्वनिल मोहरिर यांनी सामूहिक पद्य सांगितले त्या नंतर जेष्ठ स्वयंसेवक व वनवासी कल्याण आश्रम चे प्रकाश गाडगीळ सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये संघातर्फे हिंदु साम्राज्य दिन साजरा करण्याचा उद्देश विशद केला तर प्रमुखवक्ते हर्षद गद्रे सर यांनी आपले अभ्यास पूर्ण भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक ऐतिहासिक पराक्रमचे सन तारखे सह दाखले देत त्या काळात सुमारे १००० वर्षात हिंदू राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली व स्वतः ला हिंदू धर्म पध्दतीने राज्याभिषेक करून घेत एक सुवर्ण पर्व हिंदू समाज व संस्कृती साठी सुरु केले या हिंदू साम्राज्य दिन साजरा करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे यातून तरूण पिढीला देव देश आणि धर्म कार्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले. उपस्थित सर्व स्वयंसेवकानी शिस्तबद्ध रीतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नांदगाव तालुका सहकार्यवाह चेतन गंगेले यांनी केले तर कार्यक्रम चे संयोजन अनंता भामरे,राजाभाऊ बुऱ्हाडे यांनी केले .मनमाड शहर व परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा ,वनवासी कल्याण आश्रम या सह संघ परिवारातील स्वयंसेवक व शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.