युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून , युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ शितलताई देवरुखकर शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिंडोरी लोकसभा विस्तारक सौ अश्विनी ताई चव्हाण व नाशिक जिल्हा प्रमुख फरहान दादा खान यांच्या सहकार्याने व नांदगांव तालुका आमदार सुहास अण्णा कांदे व अंजुम ताई कांदे यांच्या सहकाऱ्याने नांदगाव विधानसभा तालुका अधिकारी नेहा ताई जगताप , उपतालुका अधिकारी सपना ताई महाले, तालुका चिटणीस स्नेहल ताई जाधव व युवती सेना युवती कविता ताई कालसर्प व अक्षरा शुक्ला यांनी मनमाड मधील गुरुद्वारामध्ये ५० गरीब रहिवासी यांना मोफत खिचडी वाटप करून आदित्य ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.
तसेच मा. आदित्य जी ठाकरे यांना दिर्घ आयुष्य लाभो या साठी मनमाड येथे आलेले गुरुद्वारा येथे चादर अर्पण करण्यात आली.














