Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात “वटपौर्णिमा” सुहासनिंकडून उत्साहात साजरी

Jun 14, 2022


मनमाड :(योगेश म्हस्के) भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं वेगळं महत्व आहे. वट पौर्णिमा या सणाचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व खूप वेगळं आहे. आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेने भारतीय महिला उपवास करतात. सोबतच वडाच्या झाडाची पूजाही करतात.हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

मनमाड शहरामध्ये सुवासनिंकडुन वटपौर्णिमा भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्रियांनी आपल्या पतीसाठी उपवास करून वडाच्या झाडाची पुजा केली. यावेळी अनेक ठिकाणी वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी महिलांची गर्दी पाहण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]