loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Jun 14, 2022


मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकूण १५ संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार असून सर्वसाधारण जागा १०, अनु.जाती/ जमाती प्रतिनिधी १,महिला प्रतिनिधी २,इतर मागास प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती/जमाती/ विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ असे एकूण १५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३७६१ मतदार असलेल्या प्रगती बँकेची मागची निवडणूकही आरोप – प्रत्यारोपाने गाजली होती.मंगळवार १४/६/२०२२ ते सोमवार २०/६/२०२२ यादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात येणार असून जसजशी नामनिर्देशन पत्रे प्राप्त होतील तसे रोज संध्याकाळी ४ वाजता नामनिर्देशन पत्र सूची प्रसिद्ध करण्यात येईल. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार दिनांक २१/६/२०२२ सकाळी ११ वाजता होणार असून दिनांक २२/६/२०२२ रोजी वैध नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २२/६/२०२२ ते ०६/०७/२०२२ या कालावधीत माघार घेऊ शकता. ०७/०७/२०२२ रोजी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रविवार १७/७/२०२२ रोजी मतदान होणार असून सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपावेतो वेळ असणार आहे. मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८/७/२०२२ रोजी होणार असून निकाल जाहीर केला जाईल.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.