loader image
[ays_poll id=7]

आता रक्तदान करा आणि घ्या व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ : साई संस्थानचा निर्णय

Jun 15, 2022


रक्तदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी आणि नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. साईबाबांच्या शिर्डीत मध्ये सुध्दा वर्षाकाठी साधारण १५ हजार रक्तबॅगचे संकलन केले जाते. यात साई मंदिर परिसरात रक्त संकलन केंद्राच्या माध्यमातून ऐच्छिक भाविक रक्तदात्यांकडून रक्तदान स्वीकारले जाते. रक्त हा शरीरातील असा घटक आहे. ज्याला प्रत्यक्षात मनुष्याची गरज पडते. हेच लक्षात घेवून साईबाबा संस्थानच्या वतीनं सोने-चांदी आणि पैशात डोनेशन देणाऱ्या भाविकाप्रमाणे आता रक्तदात्याला व्हीआयपी सुविधा देवून त्याचा सन्मान केला जात आहे.

साईबाबांनी शिर्डीत आपल्या हयातीत आरोग्यसेवा करुन अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. हाच आरोग्य सेवेचा वसा साईसंस्थान दोन मोठी रुग्णालय चालवत पुढे नेत आहे. या ठिकाणी होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदानाची आवश्यकता पडत असे. त्यामुळे साधारण 30 वर्षांपूर्वी साईसंस्थानने श्रीसाईनाथ रक्त केंद्राची उभारणी केली. याठिकाणी सुरुवातीच्या काळात रक्तदान तुरळक होत असे. मात्र अलीकडे रक्तसंकलन मोठ्या प्रमाणात होत आहे.

भाविक होतोय रक्तदाता श्री साईनाथ रक्त केंद्राबरोबरच साईमंदिरात देखील रक्त संकलन करण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याठिकाणी स्वतंत्र आणि प्रशस्त रक्त संकलन केंद्राची उभारणी केली होती. त्याच बरोबर आता साईमंदिरातील दर्शन रांगेलगत भाविकांच्या अगदी सहज दृष्टीस पडेल अशा ठिकाणी रक्त संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. जे भाविक याठिकाणी रक्तदान करतात त्यांना साईबाबांचे व्हीआयपी दर्शन आणि प्रसाद मोफत दिला जात आहे.

साईसंस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी याविषयी बोलतांना सांगीतले की, “पूर्वीचे रक्त संकलन केंद्र भाविकांना सहज दृष्टीस पडत नव्हते, त्यामुळे आता दर्शन रांगे लगतच ही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे फक्त श्रीमंतच भाविक येतो असे मुळीच नाही. सामान्य भाविकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे त्यांना बाबांच्या झोळीत काही दान टाकण्याची इच्छा असते. असे भाविक येथे अवर्जून रक्तदान करतात. साईमंदिरात 25 हजारांपेक्षा आधिक दान देण्याऱ्या व्यक्तीला व्हीआयपी सुविधा दिली जाते. तीच सुविधा रक्तदात्याला दिली जात असून यापुढे अशीच कायम असणार आहे. रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र, बुंदीचा लाडू प्रसाद, साईंची उदी आणि व्हीआयपी साईदर्शन अशी व्यवस्था साईसंस्थान करत आहे. रक्ताची किमंत होवू शकत नाही मात्र रक्तदान जनजागृती साठी संस्थानकडून हा सकारात्मक प्रयत्न केला जात आहे.”

साईनाथ रक्त केंद्रात वर्षाकाठी समान्यपणे 12 ते 15 हजार ब्लड बॅंग चे संकलन केले जाते. येथे गरजू रुग्णांना अगदी मोफत रक्त दिले जाते. रक्ताचा उपयोग गुतांगुतीचे आजार, जटिल वैद्यकीय शस्त्रक्रिया यामध्ये केला जातो. प्रसूती दरम्यान आणि नंतर गंभीर रक्तस्त्राव झाल्यानंतर रक्तांची गरज पडते अशा वेळी साईनाथ रक्तपेढी रक्त पुरवठा करत जीव वाचवल्याचे अनेक उदाहरण सर्वश्रुत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.