loader image
[ays_poll id=7]

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नांदगावच्या युवा फाऊंडेशन ने केले गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

Jun 16, 2022


समाज ‘ म्हटला तर तुमच्या आमच्या सारखे सगळेच लोक त्यात आले . रोजच्या रोज परिस्थितीशी झुंझावे लागते काही न काही गोष्टी साठी पण अशा अनेक परिस्थितीतून माणूस बाहेर पडू शकतो ते केवळ शिक्षणामुळे ..शिक्षण आणि परिस्थिती एका वर्तुळात गुंफलेले असतात. काहीजण परिस्थिती नाही म्हणून शिकू शकत नाहीत आणि शिक्षण नाही म्हणून त्यांची परिस्थिती सुधारत नाही. आज आपल्या अवतीभवती अशी अनेक ठिकाणे आहेत तिथे अपुऱ्या साधनांमुळे शिक्षण घेता येत नाही अशाच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत युवा फाऊंडेशन सामजिक संस्था पोहचत असते आज तरवाडे येथील इंद्रानगर येथील जि.प प्रा.शाळा. येथील प्राथमिक शिक्षक महेश थोरे सर यांनी काही दिवसांपूर्वी आमच्या कडे मजूर कुटूंबातील मुले प्रवेश घेणार आहेत तरी त्यांच्याकडे शालेय साहित्याची मदत युवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेकडे केली होती आज शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा वाजली आणि पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांना युवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे पाटी,पेन्सिल, अंकलिपी इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . शिक्षण आणि प्रगती एकत्र हात घालून चालतात पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर आम्ही युवा फाऊंडेशन सामाजिक संस्था म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करू असे युवा फाऊंडेशन ने सांगितले
यावेळी युवा फाऊंडेशन संस्थेचे सुमित सोनवणे. तालुका अध्यक्ष सुमित गायकवाड, शहर अध्यक्ष प्रसाद वडनेरे तसेच शाळेचे थोरे सर सानप सर व आदी शिक्षकवृद उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.