loader image
[ays_poll id=7]

सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय व जे. टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चा दहावीचा 100%निकाल.

Jun 17, 2022


नांदगाव(१७जून) .. नांदगाव येथील श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू.संस्थेच्या सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय व जे. टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चा मार्च २०२२ परीक्षेचा निकाल100 टक्के लागला असून 100%निकालाची उज्ज्वल परंपरा ही यशस्वीरित्या या ही वर्षी कायम राखली.
जे टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या संस्कृती भरतराज चव्हाण या विद्यार्थीनिने 95.60 %गुण प्राप्त करून प्रथम ,तर महक आनंद काला व निधी कमलेश सुराणा हिने 94.80%गुण प्राप्त करून द्वितीय तर स्नेहा संतोष गायकवाड हिने 94.40%गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.. विशेष प्रथम श्रेणीत 16विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत 6तर उत्तीर्ण श्रेणीत 2विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. तसेच
सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयातील समीक्षा रवींद्र बोराळे हि विध्यार्थिनीने 94 टक्के गुण मिळवून प्रथम आली तर घोटेकर दिव्या चंद्रभान हिने 93.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.तर तृतीय क्रमांक मोहिते यश हेमंत याने 92.80 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. तसेच विशेष प्रावीण्य सह प्रथम श्रेणी त 58विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत 30विद्यार्थ्यानी तर 9विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापक यांचे संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमार कासलीवाल, सचिव श्री विजयकुमार चोपडा, सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री रिकबकाका कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदीवाल, प्रशासक गुप्ता सर, प्राचार्य मनी चावला , मुख्याध्यापक (माध्य.) गोरख डफाळ, मुख्याध्यापक (प्राथ) विशाल सावंत यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.