माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, नाशिक मार्फत फेब्रुवारी / मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी एस. एस. सी. परीक्षेत मनमाडच्या एच.ए. के. हायस्कूल & ज्यु.कॉलेजचा निकाल ९८.६४ % टक्के लागला असून शाळेतून एकूण १४८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाळेतून डिस्टींकशन १०० विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३७ विद्यार्थी, व्दितीय श्रेणी ९ विद्यार्थी, उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.उर्दू माध्यमात प्रविष्ठ झालेले एकूण ५० विद्यार्थ्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उर्दू माध्यमाचा निकाल १००% लागला असून उर्दू माध्यमात प्रथम १) शेख गौसिया कमरोद्दीन ९०.२०% २ ) शेख मिश्कात अशफाक ९०.००% २) चौधरी मुस्कान तजम्मुल ९०.००% ३) खान मसिरा उस्मान ८८.२० %.
तसेच इयत्ता १० वी मराठी माध्यमाचा निकाल ९८.६४ % लागला असून परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या ९८ विद्यार्थ्यापैकी ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयातून मराठी माध्यम प्रथम १) वाघ संजना बबन ८९.२० % २) पटेल मोहम्मद कैफ सलीम ८८.८० % २) शाह मुस्कान गुलाबनबी ८८.८० % ३) शाह अक्सा खालीद ८८.६० %
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शाळेचे नांव उज्वल केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी, सचिव हज्जन सायराबानो सलीम, संस्था सदस्य आयशा सलीम गाजीयानी,रियाजभाई अन्सारी, सादिकभाई पठाण संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद सर, शेख आरीफ कासम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













