loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैभवी धिंगे भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र

Jun 18, 2022


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीमध्ये शिकणारी कुमारी धींगे वैभवी सचिन या विद्यार्थिनीने मार्च /एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत 88.66% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून तिने घवघवीत यश मिळविले आहे.
कुमारी वैभवी ही भारत सरकारच्या INSPIRE शिष्यवृत्ती साठी पात्र झालेली आहे. तसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नाशिक यांनी पत्राद्वारे महाविद्यालयाला कळविलेले आहे
कुमारी वैभवीने मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी तिचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. डॉ.प्रशांत दादा हिरे, संस्थेचे समन्वयक मा.डॉ. अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती संपदा दीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील,वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.ज्योती पालवे (बोडके), पर्यवेक्षक व्हीं आर फंड तसेच सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांनी कुमारी वैभवी चे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.