आज दिनांक 17 जून रोजी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल ऑनलाइन दुपारी 1 वाजता जाहीर झाला. विद्यालयाचा निकाल 84 टक्के लागला असून नियमित सर्व विद्यार्थी पास झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, सचिव श्री सुकदेव नाना बोरसे, मुख्याध्यापक श्री आवारे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच समाजसेवक आत्माराम खताळ ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयात प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
- कुमारी वृषाली दत्तू झाल्टे 86. 45%
- कुमारी समीक्षा नामदेव ठाकरे 86%
- कुमारी प्राजक्ता एकनाथ खर्डे 85 40 %
- कुमार रोहितआबळू जेजुरे 84%
- कुमारी अश्विनी रामभाऊ वरे व कुमार शिवम संजय बोरसे 83.20%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.












