loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे लेंडी नदी खोलीकरण कामास सुरुवात !

Jun 20, 2022


नांदगाव – आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधी अंतर्गत नांदगाव शहरातील लेंडी नदी खोलीकरण व संरक्षित भिंत कामाचा शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी नंतर मोठ्या प्रमाणात नांदगाव शहरातील नदीलगतच्या व्यवसायिक व सामान्य नागरिकांचे नुकसान झाले होते, काही दिवसांपूर्वीच नांदगाव नगरपालिकेतर्फे वादग्रस्त मटन मार्केट पाडण्यात आले तसेच नदीकाठावरील सर्व अतिक्रमण काढण्यात आले असून नदी खोलीकरणाचे काम सुरू झाले.
श्रीफळ वाढवून या कामाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, अरुण भोसले, संतोष भोसले,दिलीप पारख, महेंद्र गायकवाड भरत मोकळ,संतोष शर्मा,भाऊराव पाटील, मा.नगरसेवक ॲड. सचिन साळवे,प्रदीप कासलीवाल बाळासाहेब शेवरे, रवींद्र पवार,याकुब शेख,शकील शेख,गणेश शर्मा,दीपक खैरनार,विजय भावसार,राजू भावसार, आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.