महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 21 जून 2022 रोजी जमीन देणगीदार, तथा माजी नगराध्यक्ष लोकनेते स्व. तुकाराम पाटील यांची 28 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी लोकनेते तुकाराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून सादर केला.
याप्रसंगी लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष श्री यशोदीप पाटील (शिंदे), वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे (बोडके) पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, कु.स्वर पाटील (शिंदे), कू.रुही पाटील (शिंदे), महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











