loader image
[ays_poll id=7]

छत्रे विद्यालयाच्या वतीने योग दिन साजरा

Jun 21, 2022


विश्व योग दिनाचे निमित्ताने छत्रे विद्यालयाचे वतीने महर्षी वाल्मिकी स्टेडियम आय यु डी पी येथे योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रतिष्ठा प्रवीण व्यवहारे कृष्णा संजय व्यवहारे योगेश पवार यांनी सूक्ष्म व्यायाम,दंड स्थिती बैठक स्थिती, शयन स्थिती, विपरीत शयन स्थितीतील योग् प्रात्यक्षिक सादर करीत उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली या प्रसंगी छत्रे विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी यांनी उपस्थित राहून योगासनांचा आनंद लुटला
छत्रे विद्यालयाचे शिक्षक धनंजय भामरे व सुमंत अंबर्डेकर यांनी नुकत्याच केलेल्या लेह लडाख येथील साहसी मोटर सायकल मोहिमे विषयीचे रोमांचक अनुभव सांगितले शाळेच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब दिंडोरकर व सचिव दिनेश धारवाडकर यांनी त्यांचा साहसी मोहिमेबद्दल सत्कार केला मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे जेष्ठ नागरिक संघाचे भागीनाथ सोनार यांनी मनोगत व्यक्त केले
योग दिनाचे महत्व सांगत क्रीडा प्रशिक्षक पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे यांनी सर्वांना दररोज योग करण्याचे आवाहन केले
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर यांनी योगदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या
संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ एस एस पोतदार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कारभारी व पालक यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.