येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व महिला विकास कक्ष यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला. योगशास्त्राची निर्मिती प्राचीन काळापासून भारतात झाली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि महात्म्य योगातून समजले. योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तसेच आनंददायी जीवनासाठी नियमित योगासने करणे लाभदायक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. योगाचे महत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये युनोत विषद केले. त्यानंतर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी योगाचा स्वीकार केला. दि. २१ जुन २०१५ पासून जागतिक योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला . त्या अनुशंघाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, उपप्राचार्य कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य ज्योती पालवे, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य पी.के.बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण शिबीरास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल जाधव यांनी योगासनांची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड, पाहुण्यांचा परिचय रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी तर आभार प्रा. कविता कांखडकी यांनी वक्त केले. या शिबीरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











