शिवसेना महिला आघाडीतर्फे नांदगाव शहरातील महिलांना या निमित्ताने योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात विविध आजारांपासून पासून आपण स्वतःला दूर कसे ठेवू शकतो आणि यासाठी योगाचे महत्व काय ते योग्य प्रशिक्षकांनी उपस्थित मुलांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रम शिवनेरी शासकीय विश्राम गृहाच्या प्रणांगणात घेण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ.रोहिणी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी योग प्रशिक्षक सौ. पुनम आहेर यांनी उपस्थित महिलांना योगाचे महत्व सांगितले, तसेच योग प्रात्यक्षिके करवू न घेतली. योग प्रशिक्षक सौ संगीता सोना सौ अर्चना बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती बोरसे यांनी केले तसेच आभार रोहिणी मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने नांदगाव शहरातील महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











