चांदवड येथे आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका भाजपा च्या वतीने राज्यसभा व विधानपरीषेदेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापण्यात आला व पंचायत समिती चांदवड चे भाजपा चे मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे यांचे चिरंजीव ओम गांगुर्डे यांची लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, श्री. भूषण कासलीवाल श्री.बाळासाहेब माळी, डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.अशोक भोसले, श्री.अशोक काका व्यवहारे, श्री.सुनील शेलार, डॉ.राजेंद्र दवंडे, श्री.शांताराम भवर, श्री.योगेश ढोमसे, श्री.गणेश महाले, सौ.गीता झाल्टे, श्री.देविदास आहेर, विजय धाकाराव आदींसह भाजपा सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












