loader image
[ays_poll id=7]

शिवसेना आणि बाळासाहेबांची विचार यांपासून कदापिही फारकत घेणार नाही : एकनाथ शिंदे

Jun 22, 2022

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री आणि आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काल दिवसभर सूरत येथे असलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे पोहचल्याने महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने वळेल याविषयी जनतेमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काढलेला फोटो समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३३ आणि बच्चू कडू व त्यांचे समर्थक असलेले एक आमदार आणि इतर एक आमदार असे मिळून ३६ आमदार आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठलंही बंड केलेलं नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणार नाही. तसेच कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची शिकवण याच्यासोबत आम्ही कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
.