loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात स्मॅश बिट्स ने साजरा केला जागतिक संगीत दिन

Jun 22, 2022


मनमाड : येथील वेणुनाद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्मॅश बिट्स यांच्या वतीने जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधुन नेहरू भवन येथे शहरातील कलाकारांच्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मनमाड शहरातील संगीत क्षेत्रातील सर्व कलाकारांचा त्यांचा सांगीतिक सेवेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .श्री संदीप संकलेचा , श्री विकास काकडे , श्री कल्पेश बेदमुथा , श्री भुषण शर्मा , श्री पंकज जाधव , श्री योगेश म्हस्के , सौ. स्वाती मुळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते .ऑर्केस्ट्रा स्मॅश बिट्स चे सुरेंद्र भुजंग , देवेन्द्र गवांदे , सुभाष धिंगाण , आम्रपाली पगारे , समीक्षा पगारे , सम्यक पगारे या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.

भविष्यात मनमाड मधील संगीत क्षेत्रातील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन संगीत सेवा करावी असे आव्हान यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रसिद्ध गायक , निवेदक श्री सुरेंद्र भुजंग यांनी केले , रसिकांच्या पसंतीस खरे उतरण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.