मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता मात्र आर्द्र नक्षत्र लागताच वरून राजाने कृपा केली आहे. गत दोन दिवसांपासून मनमाड व परिसरात पावसाने चांगलाच जोर धरलाय.आज दुपारी १२ वाजेपासून मनमाड शहराला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल च्या प्राथमिक विभागात पावसाचे पाणी शिरल्याने शिक्षक आणि बच्चे कंपनी ची चांगलीच तारांबळ उडाली.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











