चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील दीपक गोविंद झालटे यांच्या दुमजली इमारतीवर वीज पडून स्लॅब चे तसेच घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. या बाबत चे सविस्तर वृत्त असे की रविवार दिनांक २६ जून रोजी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने गावातील नागरिकांची तारांबळ उडाली. गावातील दीपक झालटे यांच्या घरावर वीज पडून स्लॅबचे तसेच घरातील विद्युत उपकरण फ्रीज, टीव्हीं, फॅन इत्यादी वस्तूचे नुकसान झाले.सुदैवाने घरी कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.












