मनमाड : (योगेश म्हस्के) विठु माझा लेकुरवाळा….संगे बाल गोपालांचा मेळा , सध्या महाराष्ट्रातील अनेक गावातुन पंढरीच्या दिशेने आषाढीवारी निमित्ताने दिंड्यांचे प्रस्थान होत आहे , याच निमित्ताने मुरलीधर नगर येथील अंगणवाडी मध्ये लहान विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
अंगणवाडीतील लहान मुलांनी विठ्ठल-रखुमाई , वारकरी , सावित्रीबाई आणि विविध प्रकारच्या वेशभूषा करून हातात टाळ , डोक्यावर तुळशी वृंदावन , हातात भगवी पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले. दिंडीत सहभागी झालेले विद्यार्थी , शिक्षक आणि पालकांनी झाडे-लावा , झाडे-जगवा , बेटी-बचाव , बेटी-पढाव , निसर्गाचे संगोपन करा अशा घोषणा देत अंगणवाडी परिसरात दिंडी काढली.
या दिंडीमध्ये धनश्री थोरात, अधिरा म्हस्के, आराध्या उगले, मनस्वी जाधव,विहान बच्छाव, आराध्या सानप, स्वरांजली देवरे, प्रशिका जाधव, शौर्य दंडगव्हाळ, तेजस्विनी वाघ, आराध्या पाटील, रुद्र कोंढारे, जिया बगाडे, सानवी उबाळे, शौर्य गांगुर्डे, प्रिन्स पाटील, प्रणय झाल्टे, आरोह राख, आरोही राख तन्वी देवळे, क्रियांश रसाळ, अवनीश ठाकरे, श्लोक सोनवणे, स्वरूप अंकुश हे विद्यार्थी सहभागी झाले होते.अंगणवाडी शिक्षिका सौ. अडसुळे मॅडम , सौ.इप्पर मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.














