loader image
[ays_poll id=7]

भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाल्याबद्दल ओम गांगुर्डे आणि वेदांत घंगाळे ह्यांचा सत्कार

Jun 27, 2022


चांदवड:  श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ओम नितीन गांगुर्डे आणि वेदांत प्रशांत घंगाळे या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांनी दिली. श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नितीन गांगुर्डे मा सभापती प स चांदवड यांचे सुपुत्र ओम नितीन गांगुर्डे आणि प्रशांत घंगाळे आर्थिक सल्लागार नाशिक यांचे सुपुत्र वेदांत प्रशांत घंगाळे या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रमुख अतिथी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, गटविकासाधिकारी महेश पाटील, गटशिक्षाधिकारी संदिप शिंदे, विस्ताराधिकारी कैलास पगार, विजय पगार, नेमिनाथ जैन संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, केंद्रप्रमुख हिरालाल बधान, संदिप महाले एम एल गोरडे यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी सत्करार्थी ओम गांगुर्डे यांनी भरकटत जाणाऱ्या तरुण पिढीने सैन्य दलात का भरती व्हावे या विषयी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच आपली दोन्ही मुले सैन्य दलात कार्यरत असलेले मा.पंढरीनाथ शिंदे यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले.  या निमित्ताने विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबिलाल संचेती उपाध्यक्ष दिनेश लोढा प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा उपाध्यक्ष अरविंद भन्साळी विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांनी सत्करार्थींचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य संगीता बाफना यांनी केले. तर सूत्रसंचलन महेश देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता ठाकरे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.