loader image
[ays_poll id=7]

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांची प्रथम खेलो इंडिया रांकिंग (महिला) स्पर्धेत कौतुगास्पद कामगिरी

Jun 28, 2022


शैक्षणिक वर्ष २०२२ दरम्यान नागरोटा हिमाचल प्रदेश येथे दिनांक १७ ते २२ जून २०२२ पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची कु. दिया किशोर व्यवहारे व कु धनश्री विनोद बेदाडे निवड उपोरोक्त स्पर्धेत झाली. महाविद्यालयाची खेळाडू जिने या आधी अखिल भारतीय विद्यापीठ , खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत आपला सहभाग नोंदविलेला होता अशी कु दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात 131 किलो वजन उचलून ज्युनिअर मध्ये कांस्यपदक व 8 हजार रुपये रोख पारितोषिक तसेच सिनियर मध्ये पाचवा क्रमांक व 6 हजार रुपये रोख पारितोषिक पटकावले त्याच बरोबर महाविद्यालयाची दुसरी राष्ट्रीय खेळाडू कु धनश्री विनोद बेदाडे हिने 76 किलो वजनी गटात 64 किलो स्नॅच 75 किलो क्लिन जर्क 139 किलो वजन उचलून ज्युनियर मध्ये पाचवा क्रमांक व 5 हजार रुपये रोख पारितोषिक पटकावले.

उपोरोक्त स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतर खेळाडूंची कामगिरी देखील कौतुकास्पद होती. महाविद्यालयातील या विद्यार्थ्याने यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड व महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.