सुमारे ९ दिवसांपासून राज्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन होत आहेत. गुवाहाटी ला गेलेल्या आमदारांचे समर्थक ही विविध ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून प्रत्यूत्तर देत आहे. आज मनमाड शहरात शिवसेनेच्या एकनिष्ठ, निष्ठावान लोकप्रतिनिधी,आजी माजी पदाधिकारी यांनी आज पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली चे आयोजन केले होते मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमत घोषणाबाजी करण्यात आली.














