मनमाड (योगेश म्हस्के) : महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेली व्याख्यानमाला म्हणून ज्या विवेकानंद व्याख्यानमालेच नाव घेतले जाते त्या व्याख्यानमालेसह अनेक विविध सांस्कृतिक उपक्रम राबवणारी मनमाड मधील संस्था म्हणजे संस्कृती संवर्धन समिती ,
या समितिचा 27 वा वर्धापनदिन नुकताच पार पडला.
या प्रसंगी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे मनमाड मधील सर्व संचालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
समितीच्या लौकिका प्रमाणे या प्रसंगी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारोत्तालन स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी आकांक्षा व्यवहारे , खेलो इंडिया स्पर्धेत देखील पहिल्या महिला भारोत्तालन स्पर्धेत कास्य पदक मिळवणारी दिया व्यवहारे ,आंतर राष्ट्रीय स्तरावर वेट लिफ्टिंग मध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणारी तृप्ती पाराशरे मनमाडच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील वेट लिफ्टिंगचे मार्गदर्शक व समितीच्या बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण व्यवहारे सर या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे यंदाचे वर्षी मनमाड मधील सरस्वती विद्यालयाचा दहावीचा निकाल 100% लागल्याबद्दल त्या शाळेच्या सर्व शिक्षकांचा सत्कार शाळेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत समितीच्या वतीने केला गेला.
याप्रसंगी प्रमोद मुळे यांनी समितीचे गेल्या सव्विस वर्षातील कार्याचा आढावा घेतला , विकास काकडे आणि डॉ सुनील बागरेचा यांनी समायोचित मार्गदर्शन केले , सरस्वती विद्यालयाच्या कुलकर्णी मॅडम यांनी शाळेच्या वतीने मनोगत व्यक्त केले, प्रवीण व्यवहारे यांनी अध्यक्षीय भाषणातून समिती पुढेही असेच भरीव काम समाजासाठी करित राहील झ आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे , असे आवाहन करून आभार प्रदर्शन केले व पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती झाली. समितीच्या प्रथे प्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .
अध्यक्ष :- प्रमोद मुळे
सचिव :- महेश नावरकर
अर्थ सचिव :- अमोल तावडे
प्रसिद्धी प्रचार प्रमुख:- योगेश म्हस्के
कार्यालय प्रमुख :- रत्नाकर घोंगड़े नवीन कार्यकारिणीच्या पहिल्या मीटिंग मध्ये शालेय स्पर्धांची घोषणा करण्यात आली , सर्वांसाठी खुली असलेली ही स्पर्धा सर्व शाळेंच्या इयत्ता पांचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी वर्गासाठी असून ती 24 जुलाई 2022 रविवारी छत्रे विद्यालयात घेतली जाईल , त्यासंबंधीचे पत्र लवकरच सर्व शाळेला दिले जाईल अशी माहीती नूतन अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी दिली आहे .















