मनमाड (योगेश म्हस्के) : दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहिले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवतो याची खात्री करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो. भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मानार्थ 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
याच दिनानिमित्त मनमाड येथील करुणा हौस्पिटल येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला , हौस्पिटल मधील सर्व डॉक्टर ,नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.शहरातील कांचनसुधा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि नर्स यांची वेशभूषा सादर करून तर काही विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती आपले विचार मांडुन करुणा हौस्पिटल येथे ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला , यावेळी हौस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत देखील करण्यात आले.












