मनमाड येथील संत झेवियर हायस्कूल चे माननीय मुख्याध्यापक सॅबी कोरिया हे 22 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी आयोजित कृतज्ञता व सत्कार सोहळ्यासाठी संस्थेचे मॅनेजर फादर डायन लोबो, माननीय पर्यवेक्षिका सिस्टर्स शैला, प्राथमिक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. अर्चना निकाळे मॅडम, माजी मुख्याध्यापक फादर नाझरेथ ,तसेच फादर लॉईड, ब्रदर वेन्सिल, ब्रदर इन्फंट, सिस्टर अग्नेस ,फादर सहाय्य राज, सिस्टर ज्योत्स्ना ,सिस्टर जॉली, श्री मस्करन्स सर, ज्येष्ठ पत्रकार श्री नरेश भाई गुजराथी ,अमीन शेख माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, गणेश भाऊ धात्रक, डॉक्टर सुधीर जाधव त्याचप्रमाणे नगरसेवक संजीवभाऊ निकम लियाकत भाई शेख ,किरण शिंदे, सचिन दराडे , छत्रे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत रमेश थोरात सर, उप मुख्याध्यापक श्रीयुत संदीप देशपांडे सर, माजी आमदार श्रुत जगन्नाथ भाऊ धात्रक, गुरुदीप सिंग कांत, लवकुमार माने, फ्रान्सिस फर्नांडिस, श्री नरिमन भाई, मुकुंद झाल्टे, श्री. संजीव बोरसे, सतीश केदारे, दीपक पगारे, उत्तम गांगुर्डे, मनमाड पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सुनील भाऊ पवार व संदीप झाल्टे, माणिकपूर सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक मायकल गोन्साल्विस व त्यांचा स्टाफ, तसेच माननीय फादर कोरिया यांचे नातलग आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर सत्कारमूर्ती फादर सॅबी कोरिया यांचा सत्कार माननीय सिस्टर शैला, फादर लॉईड, श्रीमती जयश्री पारखे मॅडम विना लोबो मॅडम श्रीयुत महेश भोसले सर आदी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षिका यांच्या हस्ते तसेच संत झेवियर प्राथमिक शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या हस्ते माननीय फादरांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना एक स्नेहभेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत वाले यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री. अनिल निकाळे यांनी करून दिली. सौ योगिता गोडळकर यांनी आभार मानले .याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर शैला, ज्येष्ठ शिक्षक श्री आचारे सर , सिनिअर क्लर्क सौ विना लोबो मॅडम, माणिकपूर येथील मुख्याध्यापक मायकेल गोन्साल्विस, सेबी फादरांचे भाची रेचल डीमोंते ,भाच जावई लीजबॉन इत्यादींनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त झालेल्या फादरांचा गुणगौरव केला. श्रीयुत अशोक गायकवाड सरांनी आपल्या स्व गीत रचनेतून फादरांच्या मनातील भावना गाऊन दाखवल्या तर संत झेवीरच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक शाळेने तसेच मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळे च्या बालकलाकारांनी स्वागत व आशीर्वाद पर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सत्काराला उत्तर देताना आपल्या कार्यकाळात सगळ्यांचेच सहकार्य मला लाभल्याने मी शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकलो याचे मला भरपूर समाधान लाभले असे, भावोद्गार सेवानिवृत्त झालेल्या माननीय मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया यांनी काढले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सुधाकर कातकडे, दत्तू जाधव व स्वप्निल बाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय लेझीम पथकाने उपस्थित सर्व मान्यवरांना लेझीम प्रात्यक्षिकातून अनोखी मानवंदना दिली. तर श्रीमती जयश्री पारखे मॅडम, सौ अंजलीना झेवियरमॅडम व अशोक गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली गायक वृंदा ने निरोपाचे गीत गाऊन वातावरण अधिक भाव विभोर केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शाळेतील माजी मुख्याध्यापक व शिक्षक हितचिंतक व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.













