मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सचिन कुमार पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या 67 वा वर्धापन दिनानिमित्त आणि भारतामध्ये आजादी का अमृत महोत्सव (AKAM) साजरा करण्यात आला याप्रसंगी पीएम स्वनिधी अंतर्गत 10 लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची कर्ज वितरित करण्यात आले याप्रसंगी मनमाड एसबीआय शाखेचे व्यवस्थापक श्री कुलकर्णी साहेब आणि मनमाड नगर परिषदेचे व्यवस्थापक श्री संदीप आगोणे यांच्या हस्ते प्रत्येकी 10000/-रुपये रकमेचा धनादेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी मनमाड नगरपालिका पथ विक्रेता नियोजन समितीचे सदस्य श्री अकबर शाह तसेच सीमा स्किल ट्रेनिंग सेंटरचे संचालक सीमा वानखेडे व रेखा गांगुर्डे तसेच अपंग आघाडीचे हिरामण मनोहर उपस्थित होते त्याचप्रमाणे मनमाड शहरातील फेरीवाला घटकातील लाभार्थी देखील उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











