नांदगांव : डाॅक्टर हे जनतेची प्रामाणिकपणे अहोरात्र सेवा करीत असतात डाॅक्टर देवदुत म्हणून काम पाहतात,त्यांनी,कोरोनाच्या काऴात, जनतेचे,देवदूत डाॅ रोहन बोरसे,यांनी नांदगांव तालुका नव्हे तर मालेगांव येथे करोना देवदूत म्हणून सेवा दिली,तसेच नांदगांव तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष जगताप, डॉ. आनंद पारख,डाॅ.सचिव अत्रे ,डाॅ गणेश चव्हाण,डाॅ योगिनी गणेश चव्हाण,बालतज्ञ डॉ संदीप पाटिल, नांदगांव तहसीलदार डाॅ. सिद्धार्थ मोरे यांच्या सह, सर्व डाॅ यांचा गुलाब पुष्प व शाल देवुन डाॅक्टर दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. या निमित्त आपण सर्व जण मिऴुन एक दिवस,डाॅक्टर दिन मोठया प्रमाणात साजरा केला पाहिजे व त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला पाहिजे.असे कौतुकास्पद गौरवोउदगार कामगार यूनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार यांनी काढले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, सचिव रमाकांत सोनवणे ,श्रीकृष्ण रत्नपारखी, नितिन कोठावदे सर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक भालचंद देशमुख राजेंद्र जाधव,हे या प्रसंगी उपस्थित होते संस्थेच्या वतीने अनिल धामणे यांनी आभार मानले.













