मनमाड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंडियन हायस्कुलचा आज 100 वा वर्धापनदिन आज शाळेतील लोकमान्य हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
3 जुलै 1922 साली मनमाड मध्ये शाळेचे संस्थापक कै.श्री दत्तात्रय सिताराम सप्रे उर्फ रावसाहेब यांनी इंडियन हायस्कुल ची सुरवात केली. शाळेने आपल्या या 100 वर्षांच्या प्रवासा मध्ये हजारो विद्यार्थी घडवले.यातील अनेक विद्यार्थी हे आज समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमठवत आहे.आज म. रे.मा. विद्यालय आपला 100 वर्षांचा प्रवास पुर्ण करत आहे. यानिमित्ताने आज शाळेतील लोकमान्य हॉल मध्ये वर्धापन दिनाचा छोटेखानी कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. शाळेला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नाशिक येथील प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री विनायकरावजी गोविलकर , जेष्ठ विधिज्ञ श्री मिलिंदजी चिंधडे , श्री प्रतापरावजी सप्रे , माजी आमदार श्री जगन्नाथ धात्रक , श्री रमाकांत मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आणि स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला केक कापुन शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडताना शाळेचा इतिहास , शाळेची वाटचाल सांगुन शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या अनेक माजी विदयार्थ्यांनी शुभेच्छापर संदेश पाठवले होते , या माजी विद्यार्थ्यांच्या संदेशाचे वाचन शाळेच्या शिक्षिका सौ.हांडोरे मॅडम यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते यंदाच्या वर्षीच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गुणगौरव करण्यात आला.
शाळेच्या या शतक महोत्सवी वर्षामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून शाळेची शतकपूर्ती साजरी करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेचे शिक्षक श्री हर्षद गद्रे सर यांनी केले. आजच्या या 100 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास शाळेचे संचालक , शिक्षक , माजी विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.















