loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jul 4, 2022


राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींचे परिणाम आता स्थानिक पातळ्यांवर पडण्यास सुरुवात झालेली आहे.महविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतून तब्बल ४० आमदार व अपक्ष असे सुमारे ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तसेच असमान निधी वाटप या मुद्द्यावर आपली वेगळी चूल मांडत भाजपा सोबत सरकार स्थापन केले असून विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत मनसुबे जाहीर केले आहे. मात्र स्थानिक पातळीवरील शिवसेनेचा कार्यकर्ता अद्यापही द्विधा मनस्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. काल रविवारी नांदगाव तालुक्यातील शिवसेनेचे कट्टर, निष्ठावंत शिवसैनिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना मुंबई,मातोश्री येथे पाचारण करण्यात आले होते. नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे आणि नजीकच्या काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,मार्केट कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे.

सर्वसामान्य शिवसैनिकांच्या एकतेची वज्रमूठ अधिक घट्ट करण्याची वेळ आलेली असून शिवसेनेने सर्वांना मोठे केले तरीही आज गेलेल्यांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवली नाही असे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या दोन तीन दिवसात बऱ्याच घडामोडी होऊ शकतात तोपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागेल. लवकरच नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल असेही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. प्रसंग खरंच वाईट आहे मात्र मला विश्वास आहे की निष्ठावंत शिवसैनिकांच्या सोबतीने हा ही काळ निघून जाईल. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी जिल्हाप्रमुख जयंतभाई दिंडे, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, माजी आमदार राजेंद्र देशमुख,संतोष गुप्ता, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, प्रवीण नाईक, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद,सुनील पाटील,शशिकांत मोरे,प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ,दिलीप तेजवानी,लियाकत शेख, ॲड.सुधाकर मोरे,शहर प्रमुख मयूर बोरसे,दिनेश केकाण, माधव शेलार, अशोक पदमर,कैलास भाबड,अंकुश गवळी,राहील मन्सुरी,सुभाष मळवतकर, सनी फसाटे, शैलेश सोनवणे, पंकज जाधव, कचरू आव्हाड,राजाभाऊ आहेर, पप्पू परब, छोटू राऊत, प्रवीण सूर्यवंशी, नितीन राजपूत, यागेश शर्मा, विकी सूरवसे,संजय गवळी,इरफान शेख,संजय कटारिया,कुणाल सोनवणे,रवी खोटरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांची शिव सेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदार संघातील सद्य परिस्थितीवर चर्चा केली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.