loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित) मनमाड येथे एकदिवसीय मूल्य संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

Jul 4, 2022


मनमाड (योगेश म्हस्के): गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच श्री नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) मनमाड येथे ‘बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत’ एक दिवसीय ‘मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर’ संपन्न झाले.यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.प्रथम श्री सरस्वती पुजन होऊन मुलामुलीनी आपले कलागुण सादर केले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी मुला मुलींना माहितीसाठी विविध प्रकारचे स्टॉल जसे औषधी वनस्पती,कडधान्य चे प्रकार, तृणधान्याचे प्रकार,मसाल्याचे प्रकार ,डाळींचे प्रकार,विविध प्रकारची वृक्ष व भाजीपाला, भौमितिक आकार, विविध प्रकारच्या चवीचे प्रकार,पारंपारिक व आरोग्यदायी घरगुती उपकरणे इत्यादी तसेच पालकांसाठी देवघर देव्हारा,सत्यनारायण पूजा मांडणी इत्यादी चे स्टॉल लावण्यात आले होते. मुला मुलींना तसेच पालकांना केंद्रात दर रविवारी सुरू असलेल्या बालसंस्कार वर्गाबद्दल ची माहिती व महत्त्व सांगण्यात आले.

सदर शिबिरात केंद्रातील बालसंस्कार विभागात कार्य करणाऱ्या सेवेकरी भारती लांडगे,सरोज देवरे,नंदा बिडवे,रत्ना सूर्यवंशी,वर्षा कोतकर यांनी शिबिराचे नियोजन केले , यावेळी विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार, शिस्त,सूर्यनमस्कार,योगासने, व्यायाम,स्तोत्र-मंत्र आदींचे महत्त्व सांगण्यात आले तसेच दर रविवारी केंद्रात भरविण्यात येणाऱ्या बालसंस्कार वर्गास सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक यात सहभागी झाले होते. महाप्रसादाने या शिबिराची सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.