loader image
[ays_poll id=7]

ना. भारती पवार यांच्या उपस्थितीत दीपक गोयल यांचा भाजपा मध्ये प्रवेश

Jul 5, 2022


दीपक गोयल यांचा केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत स्वगृही भाजपा मध्ये प्रवेश मनमाड शहरातील प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवक दीपक प्रकाश गोयल यांनी आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारतीताई पवार यांचे उपस्थिती मध्ये भाजपा मध्ये प्रवेश केला. मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.दीपक गोयल हे पूर्वी भाजपा चे सक्रिय पदाधिकारी होते त्यांनी 2004 ते 2010 भाजपा मनमाड शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती,परंतु गत काही काळा पासून ते काही खाजगी कारणास्तव राजकारणा पासून अलिप्त होते. आज त्यांनी भाजपा च्या विचारधारे वर सकारात्मक सक्रिय निर्णय घेतला आहे.दीपक गोयल यांचे भाजपा त सक्रिय होण्याच्या निर्णयामुळे मनमाड भाजपा ला फायदा होणार आहे. या प्रवेश सोहळा कार्यक्रम प्रसंगी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, भाजप आर्थिक सेलचे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनवात, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचीन संघवी, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत, शहर सरचिटणीस नितीन परदेशी, नितीन अहिरराव अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष जलील अन्सारी, अकबर शहा ,धीरज भाबड,नारायण जगताप ,डॉ सागर कोल्हे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन भाजप मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.