loader image
[ays_poll id=7]

सुनील आहेर यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

Jul 5, 2022


नांदगाव कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांच्या विरोधात उपोषणास बसलेले सुनील आहेर यांचे उपोषण सहाय्यक निबंधक चद्रकांत विघ्ने यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने व खरेदी विक्री चा परवाना (अनूज्ञप्ती ) त्वरीत दिल्याने सुनील आहेर यांनी उपोषण सोडले.

याबाबत वृत असे की कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव चे सचिव अमोल खैरणार यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराच्या विरोधात न्यायडोंगरी येथील सुनील आहेर हे दि. ०४/०७/२२ पासून आमरण उपोषणास बसले होते . त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता .सुनील आहेर यांचे न्यायडोंगरी उपबाजार आवारात मे. यश ट्रेडींग कंपनी नावाने सन २०१५ /१६ या वर्षा पासून शेती माल खरेदी विक्री चा परवाना (अनुज्ञप्ती) असून सदर परवाना संर्दभात त्यांनी संपुर्ण कागदपत्रा ची पुर्तता फेर्बुवारी महिन्यात करून दिली होती. पंरतू त्यांना परवाना नुतणीकरण करूण दिलेला नव्हता . त्यामुळे ते ४/७/२०२२ पासून सहाय्यक निबंधक कार्यालय / नवीन तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले होते. बाजार समिती वर सद्या प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक तथा सहाय्यक निबंधक श्री चंद्रकांत विघ्ने कार्यालय प्रमुख भाऊसाहेब आहेर यांनी यशस्वी मध्यस्थी करीत सुनील आहेर यांना आज परवाना दिला. आहेर यांच्या वतीने जेष्ट पत्रकार जगन नाना पाटील यांनी प्रशासकांचे आभार मानले . यावेळी बाजार समिती सचिव अमोल खैरणार ‘ जेष्ट लिपीक शरद आहेर ‘ बाबा साठे ‘ सोमनाथ घोंगाणे आदी उपस्थीत होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.