loader image
[ays_poll id=7]

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ : मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Jul 6, 2022

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा आज आढावा घेतली. सर्व अधिकारी , पोलीस, पंढरपूर मंदिर समिती यांच्या सोबत आढावा घेतला आहे. यंदाच्या एकादशीचे अतिशय चांगले नियोजन केलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केलेले आहे. व्हीआयपी व्यक्तीपेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एसटीने चार हजार बस सोडल्या आहेत. गरज पडल्यास अधिक बस सोडण्यास एसटी महामंडळाला सांगितले आहे.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.