loader image
[ays_poll id=7]

रेल्वे बुकिंग अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारविरोधात उपोषणाचा इशारा

Jul 7, 2022


रेल्वेचे बुकिंग अधिकारी मनमानी कारभार करत असून त्यांच्या गलथान कारभारामुळे मालाची बुकिंग न करता सदर माल बेवारस दाखवून लिलाव करण्याचा प्रकार सुरू असल्याने संतप्त झालेल्या कार्टींग एजंटांनी या प्रकारचा निषेध करून सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करून लिलाव करण्यात येणारा माल परत मिळण्यासाठी साखळी उपोषणाचा इशारा देत निवेदन दिले आहे

मनमाड रेल्वे जंक्शन स्थानक हे उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते या ठिकाणाहून प्रवासी गाड्यासह मालवाहतुक देखील मोठ्या प्रमाणात केली जाते मनमाड स्थानकावरून शेतमालासह इतर माल परराज्यात पाठवला जातो हा माल कारटिंग एजंटद्वारे पाठवला जातो याबाबत अधिकाऱ्यांनी गलथान कारभार केल्यामुळे एजंटांनी आरोप करत निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की ३ तारखेला व्यापाऱ्याने कारटिंग एजंट अनिस पठाण यांनी ५२ बंडल केसांचा माल बुक करण्यासाठी रेल्वे स्थानकात आणला होता यातील ४५ बंडल हा फलाट क्रमांक ६ वर नेवून ठेवून ६ बंडल माल बुकिंग ऑफिसमध्ये आणला होता एकूण ५२ बंडल माल बुक करायचा होता मात्र चीफ पार्सल सुपरवायझर विवेक भालेराव आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक बी एल मीना यांनी सदर माल बुक करण्यासाठी पैशाची मागणी केली मात्र कारटिंग एजंट यांनी पैसे देण्यास मनाई केली असता मनात राग धरून केवळ ६ बंडल माल बुकिंग केला तर फलाटवर ठेवलेला माल बेवारस दाखवून अकोला येथे पाठण्यात आला आहे याबाबत सदर कारटिंग एजंट विचारण्यास गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिलीच मात्र सदर माल लिलाव करण्यात येणार असल्याचेही कळवले आहे सदर माल हा ९० लाख रुपयांचा असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि गलथान कारभारामुळे नुकसान होणार आहे सदर व्यापारी आणि एजंट हे रेल्वे नियमानुसार दंड भरण्यास तयार असून लिलाव करू नये असे सांगत आहे मात्र अधिकारी ऐकत नसल्याने अखेर मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग मध्ये कार्यरत असलेल्या सर्व कारटिंग एजंट, व्यापारी, कामगार यांनी संताप व्यक्त केला असून याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे ४८ तासात माल व्यापाऱ्यास परत करावा, दंडाची रक्कम क्सयेण्यास तयार आहे, मालाचा लिलाव करू नये अन्यथा साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कारटिंग एजंट अनिस पठाण, शिवाजी जाधव हरीश शर्मा, श्रीराम यादव, मारुती शिंदे, दिलीप नरवडे, युसूफ खान सुनील त्रिभुवन उत्तम हुसळे आशिष चावरीय, द्राक्ष कामगार संघटना पदाधिकारी यांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.