loader image
[ays_poll id=7]

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आ.सुहास अण्णा कांदे यांचे नांदगाव शहरात उत्स्फूर्त स्वागत

Jul 7, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : गेल्या 15 ते 20 दिवसांच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.सुहास कांदे आज मतदार संघात परतले. यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी आमदारांचे स्वागत करण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक नागरिक हा आमदारांचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करताना दिसून आला. याप्रसंगी मतदारसंघातील मोठे राजकीय नेते व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या अनेक भाषणांमध्ये प्रत्येकाने आ. सुहास कांदे यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे पाठीमागे उभे असून भविष्यातील वाटचालीस आ. सुहास कांदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे मत व्यक्त केले. गेल्या अडीच वर्षात आ.सुहास कांदे यांनी मतदारसंघातील नागरिकांची मने जिंकली आहेत आणि कधी नव्हे तो असा जीवाला जीव देणारा आमदार मतदारसंघाला लाभला आहे म्हणूनच आमदारांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि सदैव आमदारांसोबत राहू असे मत व्यक्त करण्यात आले.


याप्रसंगी आ .सुहास कांदे यांनी बोलताना सांगितले की आजही पक्षप्रमुख उद्धव साहेबांबद्दल व ठाकरे कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही आणि आता आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब तर मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघाचा विकास करत पुढील वाटचाल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार संघाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे हे ध्येय ठेवून अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे आ. सुहास कांदे यांनी सांगितले.
याप्रसंगी जेष्ट नेते बापूसाहेब कवडे,विष्णू निकम सर, आनंदशेट कासलीवाल ,सुभाष नाना कुठे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, पंकज दादा निकम, अंकुश कातकडे, अनिल तात्या रिंढे,रफिक शेख,गोकुळ कोठारी,डॉ.सुनील तुसे राजाभाऊ देशमुख,सुधीर देशमुख,बाळासाहेब आव्हाड , विजय इप्पर, राजेंद्र पवार, सरपंच अश्विनी पवार, दीपक सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, सुनील कासलीवाल, संदीप सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, किशोर लहाने, राजेश शिंदे, शिवसैनिक, पदाधिकारी, महीला आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.