मनमाड नगरपालिकेच्या होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार याद्यांवरील हरकतीचे निवारण करून या मतदार याद्या ऑनलाईन पध्दतीने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या असून नगरपरीषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूकीच्या पूर्वतयारीचे एक-एक टप्पे पूर्ण केले जात आहेत. अशी माहिती नगरपरीषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल यांनी दिली आहे.
प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा, त्यावरील हरकतींची सुनावणी, अंतिम प्रभाग रचना जाहिर करणे, त्यातुन आरक्षण सोडत काढण्यात आली.त्यानंतर मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. त्यावर ९३९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये ८५१ हरकती मान्य केले असून ८८ हरकती अमान्य करून अंतिम मतदार याद्या करण्यात आल्या.शहरांतील १ ते १६ या नवीन प्रभागांप्रमाणे प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून त्यात एकूण मतदारांची संख्या ६१८४० झाली आहे . त्यात ३१९१३ पुरुष , २९९८५ स्त्रिया व २ इतर अशा मतदारांचा समावेश असल्याचे याद्या ऑनलाईन पध्दतीने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत.
मात्र ऑनलाईन प्रक्रियेमध्ये क्युरी असल्याने या याद्या दिसण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागते, त्यामध्ये मनमाडच्या मतदार याद्या अपलोड झाल्यानंतर नागरीकांना त्या अवलोकन करता येतील. या याद्यांची फिजिकल हार्ड कॉपी पाहण्यासाठी व विकत घेण्यासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावी ,अशीही मागणी आजी-माजी व निवडणूकीसाठी इच्छुक असणाऱ्या भावी उमेदवारांकडून केली जात आहे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











