loader image
[ays_poll id=7]

करंजवण पाणी योजनेस यश मिळावे म्हणून मनमाडला साईबाबा मंदिरात साकडे

Jul 9, 2022


मनमाड येथील रोनक फाउंडेशन च्या वतीने अनकवाडे शिवारातील साईबाबा मंदिरात करंजवण मनमाड पाणी योजनेच्या यशस्वीतेसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांना यश मिळावे म्हणून साई बाबांना साकडे घालण्यात आले.
मनमाड येथील डॉक्टर वर्षा झाल्टे तसेच रोनक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी साईबाबा मंदिरात 101 धूप लावत साई बाबांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून प्रार्थना केली.
मनमाड शहरातील माता बहिणी तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांसाठी पाणीटंचाई हा मोठा व गंभीर प्रश्न आहे आणि आता आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून करंजवण पाणी योजना मार्गी लागली असून ती यापुढे कोणत्याही अडथळा न येता लवकरात लवकर पूर्ण होऊन आमदारांना यश मिळावे जेणेकरून मनमाडकर यांच्या सर्व महिलांना सुरळीत व मुबलक पाणी मिळेल आणि तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा असेल म्हणूनच आज आमदार कांदे यांचे आभार तसेच या कार्याला यश मिळवण्यासाठी संकल्प करत आहोत असे याप्रसंगी डॉक्टर वर्षा झाल्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडी, युवती सेना कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन डॉक्टर वर्षा झाल्टे व रोनक फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानत आपले आशीर्वाद असेच राहू द्या लवकरच करंजवण मनमाड पाणी योजनेची भूमिपूजन होणार आहे आणि आपल्या सर्वांना वेळेवर पाणी मिळणार आहे असे सांगत सर्व महिलांचे आभार मानले.
याप्रसंगी रोणक फाउंडेशनच्या डॉक्टर वर्षा झाल्टे,सचिव संतोष वाबळे,उज्वला गायकवाड, जयश्री साळवे, मनीषा शिंदे, साधना शेलार, रेखा वाबळे, जया साळवे, जाधव जयश्री, संसारे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या संगीता बागुल, पूजा छाजेड,सिद्धार्थ छाजेड, सनी बागुल उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.