loader image
[ays_poll id=7]

जालना – नगरसुल डेमो ही गाडी नाशिकरोड पर्यन्त नेण्यात यावी – जयकुमार फुलवाणी

Jul 9, 2022


दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील नांदेड रेल्वे विभागाची डी आर यु सी सी च्या सदस्यांची बैठक दिनांक ७/७/२०२२ रोजी नांदेड येथे याच रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डी आर एम) उपिंडर सिंग यांचे अध्यक्ष खाली संपन्न झाली या बैठकीत दिंडोरी लोकसभा क्षेत्राच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारती पवार यांचे मुख्य प्रतिनिधी म्हणून त्यांचेच मार्गदर्शन ने नांदेड डी आर यु सी सी सदस्य व भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी रेल्वे प्रवाशांन संबंधित विविध समस्या व मागण्या मांडल्या यात जयकुमार फुलवाणी यांनी दक्षिण मध्य रेल्वे द्वारे चालविण्यात येणारी जालना – नागरसोल डेमो गाडी संख्या 07497 ही रेल्वे प्रवासी गाडी प्रवाशांन च्या मागणी नुसार नागरसोल ऐवजी नासिकरोड पर्यंत नेण्यात यावी अशी जोरदार मागणी केली ही गाडी सकाळी नागरसोल येथे आल्या नंतर सायंकाळ पर्यंत तेथेच उभी राहते या कालावधीत ही गाडी नासिक रोड पर्यंत पुढे नेल्यास मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांन ची मोठी सोय होईल तसेच दुपारी 11-30 नंतर 03 वाजे पर्यंत नासिकरोड हुन मनमाड औरंगाबाद कडे जाण्यासाठी गाडीच नसल्याने हा पर्याय केल्यास स्थानिक रेल्वे प्रवाशांन ची मोठी सोय होईल आणि रेल्वे प्रशासनास अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळेल असे फुलवाणी यांनी सांगितले दक्षिण मध्य रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या फुलवाणी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी मध्य रेल्वे क्षेत्राची मदत लागेल असे सांगितले जयकुमार फुलवाणी यांनी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांचे माध्यमातून ही त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले या शिवाय दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या नागरसोल रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय दुपारी 12 ते 03 या कालावधीत बंद असते त्यामुळे येवला ,शिर्डी येथील स्थानिक रेल्वे प्रवाशांना ची मोठी गैरसोय होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावर ही सकारात्मक निर्णय होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले जयकुमार फुलवाणी यांचा या मागण्या मंजुरी साठी पुढे पाठविण्यात आल्या या महत्वपूर्ण बैठकीचे सूत्र संचालन नांदेड रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटिल यांनी केले तर नांदेड विभागातील सर्वच लोकप्रतिनिधी चे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.