loader image
[ays_poll id=7]

आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव

Jul 9, 2022



नांदगाव.दि.9जुलै2022,वार शनिवार येथील जे. टि कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. विठ्ठलाच्या गाण्यावर दिंडी उत्सवात साजरी करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभंग गात ,पाऊली खेळत आपला उत्साह द्विगुणीत केला.कार्यक्रमाच्यावेळी स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला सर उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी मिळून केले होते.


सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.