loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) आषाढी निमित्ताने बी.जी. दरगुडे शाळेमध्ये साजरा झाला दिंडी सोहळा संपन्न

Jul 9, 2022


मनमाड : पंढरीची वारी (आषाढी दिंडी ) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार आहे , आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला जात आहे. ही पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या या दरवर्षी आषाढी निमित्ताने पंढरपूरकडे जात असतात. याच आपल्या संस्कृतीची , संत परंपरेची ,आषाढी वारीची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी या निमित्ताने आज बी.जी.दरगुडे शाळेमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई , वारकरी आणि विविध संतांच्या वेशभूषा करून , हातामध्ये टाळ-पताका , डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन , ढोल-ताशाच्या गजरामध्ये शाळेपासन ते मुरलीधर नगर , माधव नगर , बुधलवाडी परिसरामध्ये दिंडी काढण्यात आली.

या दिंडीमध्ये बी.जी. दरगुडे शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.