loader image
[ays_poll id=7]

आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव ला शांतता समितीची बैठक संपन्न

Jul 9, 2022



नांदगाव : आषाढी एकादशी व बकरी ईद सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करत शहरातील धार्मिक सलोखा अधिक वृद्धिंगत करावा. अनुचित घटना घडू नये, दोन्ही सण शांततेत 
पार पाडावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे  यांनी शातंता समितीच्या बैठकीत केले.
कायदा सुव्यवस्थेसह शांततेस बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा  बोलताना दिला.येत्या १० जुलैस साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस कार्यालयात   आयोजित शांतता समितीच्या बैठकीत  मार्गदर्शन करतांंना ते बोलत होते.
हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले मस्तानी आम्मा दर्गा येथे असल्याने हिंदू- मुस्लिम दोन्ही समाज येथे एकोप्याने राहतात.
कोणताही अनुचित येथे प्रकार घडणार नाही.अशी माहिती शातंता समितीच्या सदस्यांनी बैठकीत दिली.
आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. दोन्ही सण एकत्र आले आहेत. त्यामुळे कुणाची भावना दुखावली जाणार नाही याची दक्षता प्रत्येकास घ्यावी लागणार आहे. शहरातील शांततेस बाधा आणण्याचा प्रयत्न कुणी करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना जनतेने द्यावी. अवैधरीत्या जनावरांची वाहतूक होत असल्यास त्याची माहिती संबंधितांनी त्वरित पोलिसांना द्यावी. 
तसेच कत्तलखान्यातून वाहून नेणारा कचरा रस्त्यावर पडणार नाही या दृष्टिकोनातून नगरपरिषद यंत्रणेने लक्ष द्यावे. सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज अथवा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे वरिष्ठाकडून  आदेश देण्यात आले आहेत. नांदगाव शहरात शांतता असून सणाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पो.नि. गाडे यांनी सांगितले.
यावेळी सहा. पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर,दत्तात्रय सोनवणे,राजु मोरे, पत्रकार, शातंता समितीचे सदस्य उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.