नांदगाव : तांदुळवाडी ता . नांदगाव येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था, संचालित. एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी निमीत्त पायी दिडीं सोहळा पार पडला.
आषाढी एकादशी निमित्ताने शनिवार ९/७/ २२ रोजी तांदुळवाडी येथील एम डी काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कुल मार्फत गावातील मंदिरात पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले होते, सर्व मुले मुली अतिशय सुंदर वारकरी पोशाख,गळ्यात टाळ व मुलीं नववारी मराठ मोळी साड़ी घालून डोक्यावर तुळशी वूंदावन घेऊन सहभागी झाले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सुंदर अश्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.प्रतिमेचे पूजन दिनेश काळे सर चेअरमन नेहा काळे प्रिंसिपल यांनी केले तसेच शिक्षीका साक्षी अहिरे , वंदना इंगोले, मनीषा डोखे, रोशनी ठेंगे,प्राजक्ता खैरनार ,अर्चना शिंदे,मंजुषा सोनार.त्याच प्रमाणे सुरसे सर यांनी आषाढी एकादशी चे महत्व व हरिपाठ घेतला,..विठ्ठल रुक्मिणी याच्या गजराने पूर्ण शाळा व गाव भारावून गेले. दिंडी शाळेतून गावात नेण्यात आली होती गावातील मंदिरात फुगड्या व नृत्य करून सर्व शाळेत आलेत व शाळेमध्ये मुलांना नाश्ता देण्यात आला. सर्व कार्यक्रम खूप सुंदर अशा प्रकारे पार पडला.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











