loader image
[ays_poll id=7]

नमन एज्युकेशन संचालित रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न

Jul 9, 2022


आषाढी एकादशी निमीत्त शहरातील नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये आषाढी एकादशी चा कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला.
आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ. सरिता बागुल रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


नविन शैक्षणिक वर्षांत आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल आणि रुक्मिणी चा पोशाख परिधान करून आले होते. सर्वप्रथम सरस्वती मातेचे तसेच पालखीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेतील आवारातून दिंडी काढण्यात आली दिंडी करून सर्व विद्यार्थी शाळेत आले आणि रिंगण करून टाळ-मृदुंगाच्या तसेच विठ्ठल नामाच्या गजरात नाचून आनंद व्यक्त करत होते. त्यानंतर मुलांना लाडू देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले अशा प्रकारे आज आषाढी एकादशीचा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यात रेम्बो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी’ प्रिया गरुड ‘ रूपाली शिंदे’ एडना फर्नांडिस ‘ मोनाली गायकवाड ‘ सुषमा बावणे’ रोहिणी पांडे ‘ चैताली अहिरे ‘ तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार, सागर कदम यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पाडला .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.