भुसावळहुन मुंबई कडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्सप्रेस मध्ये रात्रीच्या सुमारास तोतया तिकीट निरीक्षकास गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडत पकडत मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मनोज नंदकिशोर चौधरी, वय २२, रा. निंब, ता.अमळनेर, जि,जळगाव असे ह्या तोतया तिकीट निरीक्षकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक विकास साळुंखे, रामविर सिंग,राजेशसिंग राठोड, गोपलसिंग पठारिया यांनी याकामी सहभाग घेतला.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











