loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर मनसे अध्यक्ष: नवीन नियुक्ती रद्द

Jul 12, 2022



दिनांक १२जुलै २०२२रोजी मनसेचे नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात यांनी मनमाड शहर अध्यक्ष पदासाठी नवीन शहराध्यक्ष नियुक्तीपत्र दिले होते,परंतु सदर नियुक्ती पत्र हे पक्षाच्या नियमबाह्य व पक्ष हिताचे नसल्याने आणि तालुक्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वातावरण दूषित करणारे आहे. तसेच मनमाड शहराचे विद्यमान शहराध्यक्ष सचिन शिरुड हे पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी व पक्ष हितासाठी कार्यरत असल्याने आणि गेल्या सहा महिन्यापासून शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी शहरात आणि तालुक्यात केलेली पक्ष वाढीची कामगिरी बघता राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष श्री रतनकुमार इचम यांनी तालुका अध्यक्ष श्री प्रदीप थोरात यांनी केलेली नवीन नियुक्ती रद्द् करतआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष हितासाठी विद्यमान शहराध्यक्ष सचिन भाऊ शिरुड हेच मनमाड शहराचे शहराध्यक्ष आहे घोषित केले आहे.
तसेच पुढील काळामध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे की कोणत्याही प्रकारचे पद नियुक्ती पत्र देताना सदर पत्रावर जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनंत सांगळे किंवा जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम यांना पूर्वकल्पना देऊन आणि त्यांच्या सह सहीने च पत्र देण्यात यावे आणी तेच पत्र प्रसिद्ध करावे.
सदर पत्र हे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालावे या हेतूने प्रसिद्ध करण्यात येत आहे याची सर्व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी व मनसैनिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती सचिन शिरुड यांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.