loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात गुरूपौर्णिमा उत्सव विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा

Jul 13, 2022


मनमाड (योगेश म्हस्के) : गुरूर ब्रम्हा..गुरूर विष्णु… गुरूर देव महेश्वरा..गुरूर साक्षात परब्रम्ह..तसमे श्री गुरुवे नमः..अर्थात गुरुच्या रुपातच ब्रम्हा -विष्णु-महेश यांचे स्वरूप आहे.आषाढ शुल्क पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस , महर्षी वेदव्यास पौर्णिमा म्हणुन देखिल गुरुपौर्णिमेचा दिवस ओळखला जातो.

माता-पिता आपलेे प्रथम गुरू असतात, त्यामुळेच मातृ-देवो-भव , पितृ-देवो-भव , आचार्य-देवो-भव असा उल्लेख आढळतो. अर्थात आई-वडील-गुरू देवा समान असतात.गुरू-शिष्य परंपरा तसेच गुरुकुल शिक्षण पद्धती याचे महत्व पुराणकाळात आढळते.भारतीय संस्कृतीत आणि परंपरेमध्ये गुरूंना आदराचे आणि उच्चस्थान दिलेले आहे.

मनमाड शहरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती-भावाने साजरा करण्यात आला. शहरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये अभिषेक पुजन आणि महाआरती , श्री गजानन महाराज मंदिर येथे अभिषेक पुजा , होम-हवन आणि महाआरती , श्री स्वामी समर्थ केंद्र आणि मंदिर येथे अभिषेक पुजन ,आरती आणि महाप्रसाद , श्री दत्त मंदिर आणि परिसरातील वै.बालकदास महाराज , वै.ताहनजी बाबा देटके ,वै. सीताराम बाबाजी समाधी या सर्व मंदिरामध्ये सकाळी महाअभिषेक पुजा , सत्यनारायण पुजा ,आरती करण्यात आली. रायपुर येथील श्री संतधाम येथे संतांच्या समाधीचे पुजन करून , किर्तन आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधलवाडी येथील श्री संत साळीबाबा यांच्या समाधी मंदिर येथे देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने परिसरात दिंडी प्रदक्षिणा करून किर्तनाचे आयोजन करून आणि महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले.मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारा मध्ये देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने भजन ,किर्तन आणि लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा निमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.

सकाळ पासुन शहरातील भाविक-भक्त आणि नागरिक मोठया संख्येने गुरुपौर्णिमा निमित्ताने मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.